मुंबई

जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महिलांना दिल्या शुभेच्छा

पूजा विचारे

मुंबई: आज ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.  कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच. पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या. त्यासाठी वचनबद्ध होऊ या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यंदा कोरोना संकटामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात. 

शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा, किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. तर आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात आयुष्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल.

विशेषतः गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढा सुरु आहे. तो अजूनही संपलेला नाही. या लढ्यात घरा-घरात महिलांनी न डगमगता, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही आशा सेविका, परिचारिका अशा विविध जबाबदाऱ्या धैर्याने पार पाडल्या. त्यांचे हे योगदान इतिहास विसरू शकणार नाही. अशा कठीण काळात धैर्याने जबाबदारी घेणाऱ्या स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला जपणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहेच, पण आणखी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची शपथ घेऊ या. महिलांच्या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध होऊ या.

----------------------------------------

International Womens Day 2021 cm uddhav thackeray give Best wishes womens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT