prakash ambedkar  sakal
मुंबई

Mumbai : सावित्रीबाई फुले हॉस्टेलमधील विद्यार्थीनीच्या हत्येची चौकशी करा; प्रकाश आंबेडकरांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सावित्रिबाई फुले वसतीगृहात 18 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि निघृण हत्या यासंदर्भात आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नरिमन पोलिस ठाण्याच्या अधिका-यांची भेट घेतली. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, अशी त्यांनी मागणी केली. सरकार नेहमी असं करत की घटना घडल्यानंतर चौकशी सुरु करते, अगोदर उपायोजना का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

वंचित बहुजन समाज पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मरिमन पॉईट पोलिस ठाण्याच्या अधिका-यांची भेट घेतली. आज बंचित बहुजन आघाडीचे कार्यकते आणि भीम आर्मीचे कार्यकते सकाळपासून ठिय्या मांडून होते. कार्यकर्त्यानी या प्रकरणी चौकशी करावी अशी जोरदार मागणी केली. यावेळी त्या मुलीचे आई व वडिल उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, ही अत्यंत दुदैवी घटना आहे. अकोल्यामधून एक मुलगी शिकायला हॉस्टेलला येते. कुटुंबाचीही मागणी आहे की वसतीगृहाची वार्डन आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही विनंती केली पाहिजे की त्यांची चौकशी केली पाहिजे. त्या मुलींना बाजूला का ठेवलं गेले याची चौकशी करा.

त्या दिवशी दरवाजा लावला होता की नाही हे पाहा, पायपावरून चडून गेला असेल तर फिंगरप्रिंट असतील तर पाहा, पायपावर प्रिंट मिळाले नाही, तर तो गेला कसा हे पाहा, गेट लावण्याची जबाबदारी कोणाची हेही पाहा, समाज कल्याण खात्याच्या अख्त्यारीत हे हे हॉस्टेल येते. दुर्दैव आहे की समाज कल्याण खात्याच्या अधिकार्यांनी भेट दिली पाहिजे होती पण त्यांनी दिली नाही. समाज कल्याण खात्याचा हलगर्जीपणा दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मी कुटुंबियांना विनंती केली आहे की अंत्यविधी करा, आता ज्या घटना घडतायत त्यामध्ये मारण्यामध्ये क्रुरता आलेली आहे, सरकार नेहमी असं करतं की घटना घडल्या नंतर चौकशी सुरु करते पण अगोरदरच उपाय़ोजना का केली जात नाहीत असा सवाल आंबेडकर यांनी केला.

तो माणूस अनधिकृतपणे राहतो असं बोललं जातंय. तो हाच आहे का त्याचा डिएनए तपासून घ्या. एक बॉडी रेल्वेला मिळाली आहे, पंचनामा झाला तेव्हा त्या बॉडीसोबत चावी मिळाली आहे, जी त्या रूमची होती, हे कृत्य गळा दाबून केलं आहे असं सांगितलं आहे. कुटुंबाच म्हणण आहे की वार्डनने मुद्दामून या मुलीला आणखी दोन मुलींना वेगळं ठेवलं होत, या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पालिजे अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शहादत सोहळ्यासाठी अमित शाह नांदेडला येणार

Pune Crime : कोंढव्यात शस्त्राच्या धाकाने तरुणाला लुटले; मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम लंपास

T20 World Cup 2026: भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचणार की नाही? विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दलही केलं भाष्य

Gen Z Hair Loss : मागील पिढ्यांपेक्षा ‘Gen Z’मध्ये लवकर आढळतेय केस गळण्याची समस्या? ; तज्ज्ञ काय म्हणतात..

Robotic Surgery: रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमके काय? कोणत्या आजारांमध्ये याचा वापर होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT