Vishwas Nangare Patil  Sakal
मुंबई

सलमान खानसाठी IPS नांगरे पाटील मैदानात, थेट गृहमंत्र्यांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान या पिता-पुत्राला जीवे मारण्याची धमकी मिळाली. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Salman and Salim Khan threatened with death)

सलिम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलेलं होतं. यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांची पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणं मारण्यात येईल, असं म्हटलंय. या प्रकऱणा मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून गतीने तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली आहे. (IPS Vishwas Nangare Patil Meets Dilip Walse Patil )

दरम्यान, सलमान खानचं घर आणि ज्या ठिकाणी हे धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून जे कोणी संशयित आरोपी सापडतील त्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाणार आहे. कायदा आणि सुव्यस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

सलमान खान आणि त्यांच्या वडिलांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेकी करून ती चिठ्ठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. लिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

याआधी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेल्यानंतर लागलेल्या हिंसक वळणाचा तपास नांगरे पाटील यांच्या देखरेखीखाली होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Baramati: बारामतीमध्ये विदेशी दारुचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - पनवेल – कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पांतर्गत अडथळे दूर करण्याच्या कामांसाठी विशेष पॉवर ब्लॉक्स

५८ व्या वर्षीही माधुरी दीक्षितची त्वचा इतकी नितळ कशी? मुळीच चुकवत नाही 'या' तीन गोष्टी; म्हणते- सुंदर दिसण्यासाठी...

SCROLL FOR NEXT