मुंबई

सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? - मनसे

मंत्रिमंडळात बेरोजगारी, बँकांचे हप्ते यावर चर्चा होते का?

दीनानाथ परब

मुंबई: राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सलग दुसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यापूर्वी १५ एप्रिल ते ३० एप्रिल त्यानंतर एक मे ते १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला. आता लॉकडाउनचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय. मुंबईत स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आलीय. रुग्ण दुपटीचा कालावधीही १५० दिवसांपेक्षा जास्त आहे.

ठाकरे सरकारच्या या लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन लॉकडाउन वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? मंत्रिमंडळात लॉकडाउनवर चर्चा होते, तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल,जनतेचे आर्थिक नुकसान, बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का? यावर ठोस उत्तर सरकार देईल का? असा सवाल मनसेने विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT