मुंबई

इस्थर अन्हुयाप्रकरणी चंद्रभान सानपची फाशी कायम

सकाळवृत्तसेवा

मुंबई - उच्च न्यायालयाने इस्थर अन्हुया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी चंद्रभान सानप याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने केलेले अपील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंध्र प्रदेशातून मुंबईला आलेली इस्थर अन्हुया ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली. टॅक्‍सीचालक असल्याचा बहाणा करत चंद्रभान सानप याने तिला इच्छित स्थळी घेऊन जातो असे सांगितले, त्याने दुचाकीवर बसवून तिला ‘अंधेरी’ऐवजी भांडूप परिसरात नेले, या वेळी विरोध करणाऱ्या इस्थरला पूर्व द्रुतगती महामार्गावरील झुडपात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिचा खून करून मृतदेह जाळला. अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणात इस्थर अन्हुया लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सानप याच्यासोबत बाहेर पडत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर रेखाचित्र बनवून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

समाजासाठी धोकादायक
‘‘मला कशाचा पश्‍चात्ताप? मी काहीच केलेले नाही. आज खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे या लोकांनी केले. मी निर्दोष आहे,’’ असे फाशीची शिक्षा झालेला चंद्रभान सानप म्हणाला. गुन्हेगाराला कुठलाही पश्‍चात्ताप झालेला नाही, तो सुधारण्याची शक्‍यताही नाही, त्यामुळे अशी व्यक्ती समाजासाठी धोकादायक आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT