मुंबई

कोरोनामध्ये फी वाढ करणे चुकीचेच, राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद

- सुनीता महामुणकर

मुंबई: कोरोना संसर्ग सुरू असताना शाळांमध्ये फी वाढ करणेच चूक आहे, असा युक्तिवाद सोमवारी राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापनांनी कोणत्या तरतुदीनुसार फि वाढ केली आहे, असा प्रश्नही सरकारकडून विचारण्यात आला आहे.

असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल, ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन, ज्ञानेश्वर माऊली संस्था आणि नवी मुंबईतील कासेगाव एज्युकेशन ट्रस्टने फी वाढीच्या सरकारी अध्यादेशाला  न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. विनाअनुदानित शाळांना अनेक आर्थिक समस्या आहेत. तसेच शुल्क नियंत्रण समिती शाळांच्या फिबाबत निर्णय घेते आणि या फी वाढीचा निर्णय मागील वर्षी झाला आहे, असे याचिकादारांकडून सांगण्यात आले.

2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ करू नये, असे राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे सांगितले आहे. शाळांनी कोणत्या तरतुदीनुसार फिवाढ केली याचा तपशील दाखल केलेला नाही. तसेच लॉकडाऊनमध्ये शाळा बंद आहेत. त्यामुळे पालक शिक्षक सभाही झालेल्या नाही, असे सरकारकडून एड अनील अंतुरकर यांनी सांगितले. याबाबत पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

पालकांना लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे मागील थकित फी शाळा व्यवस्थापनाने एकरकमी घेऊ नये, असे निर्देशही राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे दिले आहेत.

-------------------

(संपादनः पूजा विचारे) 

It is wrong increase fees in Corona state government argues Mumbai High Court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार तायडेंच्या भावाला ठार मारण्याचा कट; माजी मंत्री बच्चू कडूंसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

AI Relationship Coach : ‘तिला इंप्रेस कसं करायचं?’ ते ‘होकार कसा मिळवायचा?’; प्रेमातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आहे AIकडे

Latest Marathi News Live Update: अशोक खरात आणि नार्वेकर यांच्यातील कॉल डिटेल्स आले समोर

Daund crime news: दौंड तालुक्यातील घरफोड्यांतील २ वर्षे फरार असलेला १२ गुन्ह्यांचा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..!

SCROLL FOR NEXT