Corona Updates  sakal
मुंबई

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्यूची (Zero corona deaths) नोंद झाली. तिसरी लाट सुरू झाल्यानंतर २ जानेवारीनंतर १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत एकाही कोरोना रुग्णाची नोंद (corona patients) झाली नव्हती. त्यानंतर १६ आणि १७ फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. आज पुन्हा एकदा एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.

मुंबई पालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद पालिका क्षेत्रात झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्येही सात वेळा एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा १,५११ इतका आहे.

राज्यात केवळ सहा मृत्यू

राज्यात आज १,४३७ नवीन बाधितांची नोंद झाली. सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा १,४३,५८२ इतका झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन १६,४२२ वर आली आहे. राज्यातील मृत्युदर १.८२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT