file photo 
मुंबई

गॅसवाहिनीच्या परिसरात राहणे घातकच : न्यायालय 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गॅस वाहून नेणारी वाहिनी असलेल्या मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घरे बांधून राहणे घातकच आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्यामुळे परिसरातील बांधकामे हटवण्याच्या कामाला स्थगिती देण्याची रहिवाशांची मागणी न्यायालयाने अमान्य केली.
 
मानखुर्दमधील बेकायदा झोपडीधारकांवर कारवाई करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. मानखुर्दसह शीव-पनवेल महामार्गालगतही अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. यावरही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर नुकतीच न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

हेही वाचा : आजपासून तुमच्या आयुष्यातील `या` गोष्टी बदलणार..

गॅसवाहिनी जात असलेल्या जमिनीवर घरे बांधून राहणे धोकादायक आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आणि एकूणच परिसराला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकादारांकडून करण्यात आली होती; मात्र ही मागणी न्यायालयाने अमान्य केली. या परिसरात पेट्रोलियम कंपन्यांचीही वाहिनी जाते.

तसेच, या भागात रस्ता रुंदीकरणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यालाही येथील अनधिकृत बांधकामांचा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे या वेळी महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. याची नोंद घेत न्यायालयाने रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिला आणि याचिका नामंजूर केली. 

हेही वाचा : व्हॅलेटाईन्स-डेसाठी थेट मॉलमधून पार्टनर घ्या भाड्यावर..

याचिकादारांच्या वतीने ऍड हर्षल मिराशी यांनी बाजू मांडली. सुमारे शंभरहून अधिक अनधिकृत बांधकामे मानखुर्द परिसरात असून याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांवरही महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT