मोखाडा : जव्हार (jawhar) तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायती मधील पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (21) (Maya Chaudhary) या आदिवासी पाच महिन्याच्या गर्भवती महिलेला (Pregnant Woman death) शेतात काम करताना सर्पदंश (snake bite) झाला. तीचा पती व नातेवाईकांनी तातडीने डोली करून, दोन किलोमीटर अंतरावरच्या पिंपळशेत आरोग्य पथकात मायाला आणले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारा जबाबदार वैद्यकीय अधिकारी (Doctor) अथवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने, अखेर मायाचा तेथेच मृत्यू झाला आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने, संपूर्ण जव्हार तालुक्यात आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
अतिदुर्गम जव्हार मधील पिंपळशेत - खरोंडा ग्रामपंचायती मधील नागरीकांना रस्ता, विज, पाणी आणि आरोग्याच्या समस्येने स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही ग्रासलेले आहे. येथे वैद्यकीय ऊपचाराअभावी आजपर्यंत शेकडो बळी गेले आहेत. अशीच घटना पुन्हा शनिवारी 23 ऑक्टोबर ला घडली आहे. पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (21) ही आदिवासी गर्भवती महिला दुपारी शेतात काम करताना तिला विषारी सापाने दंश केला.
मायाच्या पती व नातेवाईकांनी तिला डोली करून दोन किलोमीटर पायपीट करत पिंपळशेत आरोग्य पथकात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारे कोणीही उपलब्ध नव्हते, केवळ एक शिपाई होता. अखेर तेथेच मायाचा ऊपचाराअभावी मृत्यू झाला आहे. तेथुन मायाचा मृतदेह जव्हार च्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. रात्र झाल्याने माया च्या मृतदेहाचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी रविवारी 24 ऑक्टोबर ला करण्यात आले आहे. पिंपळशेत आरोग्य पथकात अनेक जागा रिक्त आहेत. तेथे पुरेसा औषधसाठा नाही तसेच रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था नाही. त्यामुळे या भागात अनेक नागरिकांचे उपचाराअभावी मृत्यू झाले आहेत.
" या ठिकाणी जे कर्मचारी कामावर नव्हते, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
- डाॅ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार.
"सदर उपकेंद्रात साप, विंचू चावल्या नंतर त्याच्यावर प्राथमिक उपचारासाठी पुरेसा औषध साठा नसतो, तसेच पिंपळशेत आरोग्य पथक येथे रिक्त पदे असल्याने व तिथे कर्मचारी राहत नसल्याने अशा अनेक घटना घडत आहे. त्यामुळे या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी."
- तुळशीराम भोवर, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळशेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.