Court
Court 
मुंबई

जिग्ना, जोसेफच्या दोषमुक्तीला आव्हान

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाच्या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आव्हान दिले आहे. सीबीआयने उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, जोसेफ यांच्या विरोधातील अर्जावर तीन आठवड्यांनी आणि जिग्ना व्होरा यांच्या विरोधातील अर्जावर 18 मार्चला सुनावणी होईल.

जे. डे. यांच्या हत्येची पद्धत पाहता या गुन्ह्यात एखाद्या टोळीचा हात असावा, असा संशय सुरवातीपासूनच असल्याने सुरवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. व्यावसायिक भांडणातून पत्रकार जिग्ना व्होरा हिने जे.डे. यांची तक्रार कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याच्याकडे केली. त्यांच्या दुचाकीचा क्रमांक आणि घराचा पत्ताही तिनेच छोटा राजनला पुरवला, जे. डे. यांच्या विरोधात छोटा राजनला भडकवण्याचे कामही तिनेच केले होते. स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ याच्या मोबाईलवरून दोन वेळा तिचे छोटा राजनशी बोलणेही झाले होते, असे आरोप होते.

पुरावे देण्यात अपयश
जे. डे. यांची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले आहे. त्यांच्या हत्येनंतर छोटा राजनने काही पत्रकारांशी संपर्क साधून गुन्ह्याची कबुली दिली होती. पत्रकारांच्या साक्षी आणि मोबाईलवरील संभाषण, तसेच छोटा राजनच्या आवाजाचे नमुने मोक्का न्यायालयाने पुरावे म्हणून ग्राह्य धरले होते. परंतु जिग्ना व्होरा आणि जोसेफ यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत न्या. समीर हडकर यांनी त्यांना दोषमुक्त केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT