मुंबई

JEE Preparing Boy Missing: पण ती संधी आली नाही… JEE निकालानंतर 17 वर्षीय मुलगा बेपत्ता, आईची व्याकूळ पोस्ट, व्हिडिओ व्हायरल

Aishwarya Musale

मुंबईमध्ये 13 फेब्रुवारीला 17 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. ज्या दिवशी मुलगा बेपत्ता झाला त्यादिवशी त्याचा JEE निकाल लागला होता. त्यादिवशी नक्की काय घडले हे त्याच्या आईने सविस्तर सांगितले आहे.

त्या मुलाची आई म्हणाली, “काय झाले ते मला अजूनही कळले नाही. कुठे चूक झाली हे मला माहीत नाही…मला एवढेच माहीत आहे की माझा १७ वर्षांचा मुलगा १३ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे.

इतर दिवसांसारखाच तो दिवस होता. मी सकाळी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि उत्कर्ष त्याचा लॅपटॉप घेऊन बसला होता. त्या दिवशी त्याचा जेईईचा निकाल लागला होता. मी पूजा करत असताना तो म्हणाला, आई, मला 69 पर्सेन्टाइल मिळाले. मार्क तर चागंले होते. पण मला त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही दिसला. मला त्याच्याशी बोलायचे होते, पण आम्हा दोघांना काम करायचे होते. म्हणून मी विचार केला, ‘मी त्याच्याशी संध्याकाळी बोलेन.’ पण ती संधी आली नाही…

दररोज तो कोचिंगवरून दुपारी २ वाजता घरी यायचा. पण त्यादिवशी ३ वाजून गेले पण तो आला नाही. त्याचा फोन घरीच होता- मी घाबरले. माझे पती सैन्यात आहेत. मी त्यांना सगळं सांगितलं ते म्हणाले, "येईल तो घरी" पण माझा उत्कर्ष तसा नाही. तो मला सांगून जातो कुठे जात आहे. पण आज त्याने काहीच सांगितले नाही

त्यामुळे मी सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. तिथे मी त्याला कॅन्टोन्मेंट परिसरामधून बाहेर जाताना पहिले. त्याने काळे आणि लाल रंगाचे जॅकेट घातले होते आणि त्याच्यासोबत जांभळ्या रंगाची बॅग होती. मग मी कोचिंग सेंटरला फोन केला. ते म्हणाले, ‘तो आज आला नाही.’ मग मी खूप घाबरले. मी लगेच एफआयआर दाखल केली.

दुसऱ्या दिवशी, पोलिसांनी फोन करून माहिती दिली की त्यांनी उत्कर्षला भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर पाहिले. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 ची ट्रेन त्याने मुंबईला जाण्यासाठी पकडली होती. काही कळत नव्हतं, फुटेजमध्ये तो कुठे जात आहे हे त्याला माहित असल्याचं दिसत होतं.

पोलिसांनी मला विचारले, ‘उत्कर्ष काळजीत होता का?’ त्याची परीक्षा होती पण त्याला काळजी नव्हती. पोलिसांनी त्याचा फोन तपासला - काहीही नव्हते. तेव्हा पोलीस म्हणाले, ‘तुमचा मुलगा पळून गेला.

पण कसं? त्याच्या सर्व वस्तू येथे आहेत - त्याचा फोन, चार्जर, कपडे. आम्ही आमच्या मुंबईतील सर्व नातेवाईकांना कळवले आहे आणि आम्ही मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहोत.

परवा, त्यांना उत्कर्ष मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सकाळी 5:00 वाजता निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पण तो कुठे आहे हेही त्यांना माहीत नाही.

प्रत्येकजण मला विचारत आहे, ‘काही झालं होतं का?’ पण मला काही कळले असते, तर मी माझ्या मुलाला जाऊ दिले नसते. आणि उत्कर्ष, जर तू हे वाचत असशील तर प्लिज घरी परत ये. आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तोपर्यंत मी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवते".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT