Jitendra Awhad Sakal
मुंबई

Jitendra Awhad : विनयभंग झाला का? आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ आला समोर

मुख्यमंत्री शिंदेंचा कार्यक्रम संपल्यावर जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचा आता व्हिडीओ समोर आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यातल्या एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते. त्यावेळी मुख्यमंत्री बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीबाहेर गर्दी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत होते. काही लोकांना बाजूला सारत होते. त्यावेळी ही महिलाही समोर आली. तिच्या खांद्याला हात लावून आव्हाडांनी या महिलेला बाजूला सारलं.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही येत आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जबरदस्ती तुमचा रस्ता कोणी रोखणारं बाजूला व्हा सांगून ऐकत नसेल तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होणार का?, असंही त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tax Hike: मोठी बातमी! पुढील २० वर्षे कोणतीही करवाढ नाही, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

Cyclone Arnab: ‘अर्णव’पाठोपाठ आता ‘मुरासू’ चक्रीवादळ; आंध्रच्या किनारपट्टीजवळ सोमवारी पोहोचणार

Pandharpur News: कर्ज फेडूनही शेतकऱ्याच्या घराला ठोकले कुलूप! २० लाखांचे कर्ज; १६ ते १७ लाख भरूनही आणखी १२ लाखांची मागणी

Latest Marathi News Update : विरोधकांना अचानक लोकशाहीचा पुळका, ठाण्यात महायुतीच्या पदयात्रेत शिंदेंचा हल्लाबोल

Narayan Surve Poetry : संघर्षातून सृजनशीलतेचा उजेड निर्माण करणारे नारायण सुर्वे; त्यांच्या कवितांचा वेगळा अर्थ सांगणारे पुस्तक

SCROLL FOR NEXT