Jitendra Awhad on his Daughter sakal media
मुंबई

'नाहीतर माझी मुलगी आत्महत्या करेल', जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर खळबळ

सकाळ डिजिटल टीम

सक्तवसुली संचलनालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांवर कारवाई करत त्यांच्या सदनिका जप्त केल्या. ठाण्यातील निलंबरी प्रकल्पातील ११ फ्लॅट्सवर ईडीने धडक करवाई करत जवळपास साडेसहा कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनाच दणका दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ सुरू आहे. या दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केल्याने वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएन न्यूज १८ ला मुलाखत दिली. यावेळी ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल, असं ते म्हणाले. तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? असा प्रश्न त्यांना पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर विचारण्यात आला.

यावर आव्हाडांनी त्यांची बाजू मांडली. मी काही चुका वगैरे केल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग-बिपिंगमध्ये चुका असतील तर काही करता येणार नाही, असं म्हटलं.

'एकूण कुटुंबाच्या दष्टीने विचार करता…' असं विचारण्यात आलं. यावेळी प्रश्न पूर्णहोण्याआधीच, 'मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते, असं आव्हाड म्हणाले. रात्री तीन वाजता टक्-टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते,' असं त्यांनी म्हटलं. असं वाटतं ईडी येतंय? आता कोणाच्या ध्यानी-मनी नाही. पण ईडी कोणाच्या घरी कोण घुसेल, सांगता येत नाही. यात सर्वात जास्त हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा राजकारणाशी देखील कोणताही संबंध नसतो,' असं उत्तर आव्हाड यांनी दिलं.

'नाहीतर माझी मुलगी आत्महत्या करेल'

आज ३८ वर्षे होत आले, मी राजकारणात आहे. माझ्या मुलीचा याच्याशी काहीही संबंध नाही. पण आज ती किती ठिकाणी संचालक आहे. आता या कारणामुळे तिला नुसतं बोलावलं तर ती आत्महत्या करेल',असं आव्हाड म्हणाले. माझी मुलगी म्हणजे फ्री बर्ड्स आहेत. त्यांना या असल्या चौकश्या वगैरेंच्या सवयी नाहीत, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT