jnpt file photo
मुंबई

टॅल्कम पावडरच्या कंटेनरमध्ये निघाले २९० किलो हेरॉईन, JNPT बंदरातील घटना

उरणमधील घटना

सुभाष कडू

उरण: उरणच्या (uran) जेएनपीटी बंदराच्या (Jnpt harbour) परिसरात सीमाशुल्क / कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी टॅल्कम पावडरचासाठा (Talcum Powder) असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये (container) २९० किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Jnpt harbour in Talcum Powder container 290 kilo drugs found)

प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्याआधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली. पुढील चौकशी सुरु आहे.

यावेळी इराणमधील टॅल्कम पावडरचा एक कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याचे कस्टम विभागाच्या निदर्शनास आले. हा कंटेनर सीएफएसमध्ये (कंटेनर फ्रेट स्टेशन्स) मध्ये ठेवण्यात आला होता. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले २९० किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून महसूल गुप्तवार्ता संचलनालय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Pune Court Verdict : १५ वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल; आरोपीला जन्मठेप!

१ लाख कर्जाचं ७४ लाख कसे झालं? व्याजाचा आकडा हादरवणार, सावकारानं किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट...

Akola Election : निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नको- मनपा आयुक्त डॉ.लहाने; निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक!

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT