lawyers. 
मुंबई

कोरोना : न्यायाधीश अन् वकिलांना पारंपारिक पेहरावातून मिळणार तात्पुरती सूट

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची बाधा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि वकिलांना काळा गाऊन व कोट या पारंपरिक पेहरावातून तूर्तास सूट मिळाली असून, सफेद शर्ट व साडी परिधान करण्याची  मुभा मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायाधीश आणि वकिलांसाठी गणवेशाचा नियम शिथिल केला आहे. सर्वसाधारणत: न्यायाधीश काळा कोट किंवा गाऊन असा पेहराव करतात. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट आणि गाऊनबाबत नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. 

राज्यातील सर्व न्यायालयांमधील न्यायाधीशांना काळा कोट किंवा गाऊन न घालण्याची; तसेच वकिलांना काळा कोट न घालण्याची परवानगी तूर्तास देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही सवलत कायम राहील, असे प्रशासनाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रासह, गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली येथील न्यायालयांना हा निर्णय लागू आहे. वकील संघटना आणि जिल्हा न्यायालये व अन्य संलग्न न्यायालयांनी याची नोंद घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना सफेद शर्ट, सलवार-कमीज किंवा साडी परिधान करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने परिपत्रकात म्हटले आहे.

Judges and lawyers will be exempted from wearing traditional attire

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT