Jumbo Recruitment of Nurses in Municipal Hospital Opportunity for earthquake victims ex-servicemen mumbai
Jumbo Recruitment of Nurses in Municipal Hospital Opportunity for earthquake victims ex-servicemen mumbai sakal
मुंबई

Mumbai News : पालिका रुग्णालयात परिचारिकांची जंबो भरती; भूकंप ग्रस्त, माजी सैनिकांना संधी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : खेळाडू, माजी सैनिक, भूकंप ग्रस्त, प्रकल्प ग्रस्त आदींना मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ६५२ परिचारिकांची भरती होणार आहे. यासाठी २१ मार्च पर्यंत लेखी स्वरुपात अर्ज करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

प्रमुख रुग्णालये व विशेष रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालये व प्रसुतीगृहांमधील रिक्त परिचारिकांच्या (नर्स) जागेवर नव्याने भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या रिक्त ६५२ जागांसाठी महापालिकेच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालय, विशेष रुग्णालय आणि प्रसूतिगृह आदी ठिकाणी परिचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त होती. त्यामुळे रुग्णालयीन कामांमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. ही पदे भरण्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची जाहिरात प्रसिध्द करून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

मुंबई महानगर पालिका आणि इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून ही निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांना ८ ते २१ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीमध्ये लेखी अर्ज करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT