ST Bus Accident Sakal
मुंबई

ST Bus Accident :भीमाशंकर हुन कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची बस 20 फूट ओढ्यात कोसळली

डी.के वळसे पाटील, चंद्रकांत घोडेकर

मंचर /घोडेगाव: भीमाशंकर हुन कल्याण ला जाणाऱ्या एसटी गाडीला आंबेगाव तालुक्यातीलघोडेगाव जवळ गिरवली च्या वळणावर स्मशानभूमी समोर अपघात झाला. एसटी गाडी पुलावरून पंधरा ते वीस फूट ओढ्यात कोसळली. या अपघातात 35 प्रवासी वाहक चालक असे एकूण 37 जण होते. सर्वजण किरकोळ जखमी असून मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

घोडेगाव येथून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी एसटी बस निघाली होती त्यावेळी एसटी सुरू होत नसल्याने प्रवाशांनी एसटीला धक्का मारला. त्यानंतर एसटी सुरू झाली. एसटीची एकंदरीत अवस्था पाहता एसटी फारच जुनी असल्याचे दिसून येते.

गिरवली येथे अपघात झाल्यानंतर सरपंच संतोष सैद, ग्रामस्थ राहुल हगवणे हर्षल गबाले विशाल हगवणे हनुमंत गबाले बाबाजी सैद त्यांच्यासह ग्रामस्थ धावून गेले. त्यामुळे प्रवाशांनी जीवाच्या भीतीने आरडाओरड करत होते. अनेकांनी काचा फोडून बाहेर प्रवेश मिळवला इतर प्रवाशांना ही मदत केली. त्यामध्ये 14 महिला 21 पुरुष वाहक चालक असे एकूण 37 जण होते. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनाही घटना कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी तब्बल बारा रुग्णवाहिका पाठवल्या.

तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालय व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा अलर्ट ठेवण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे जखमींना ताबडतोब उपचारमिळाले आहेत. उद्योजक अरविंद वळसे पाटील, यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना धीर देण्याचे काम केले. ते सतत प्रशासनाच्या संपर्कात होते.

दरम्यान, गिरवली येथे स्मशानभूमी समोर असलेले वळण धोकादायक आहे यापूर्वी तेथे अनेकदा अपघात झाले आहेत अशी माहिती गिरवली चे ग्रामस्थांनी कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कळवली. सार्वजनिक बांधकाम खात्याने ताबडतोब सदर धोकादायक वळण काढून व्यवस्थित रस्ता करावा अशा सूचना आज दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय पाटील यांना दिले आहेत. तर सारणी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सदर काम लवकर सुरू केले जाईल असे गावकऱ्यांना अश्वशित केले आहे.

वाहक प्रवीण भास्कर काकडे व चालक एस एच शेख (दोघे कल्याण आगार) यांच्या म्हणण्यानुसार पाऊस पडत होता वळणावर गाडी स्लिप झाल्यामुळे फुल तोडून ओढ्यात एसटी बस कोसळली. त्यानुसार अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT