मुंबई

Kalyan Loksabha 2024 Election Result: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा झाले खासदार, ठाकरे गटाच्या दरेकर पराभूत

Kalyan Loksabha 2024 Election Result Shrikant Shinde Shivsena winner Vaishali Darekar UBT | या लोकसभेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण,मुंब्रा हे मतदारसंघ येतात|

Chinmay Jagtap

Kalyan Loksabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात नक्की काय होईल? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.यातच आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी दणदणी विजय मिळवाला आहे. त्यानी ठाकरे गटाच्या दरेकरांना पराभूत केले आहे.

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले आहे. तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर उभ्या आहेत. या ठिकाणी एकूण 50.12 टक्के मतदान झाले.

कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने यावेळी श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदार होतील असेच चित्र आहे. मात्र निवडणुकीच्या आधी, भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणि गद्दारीचा आरोप यामुळे वातावरण फिरु शकते असेही म्हटले जात होते.मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. (shrikant shinde vs vaishali darekar)

Kalyan Loksabha

2009 पासून या ठिकाणी शिवसेनाच निवडून आली आहे. २००९ साली आनंद परांजपे, २०१४ साली श्रीकांत शिंदे तर २०१९ साली पुन्हा श्रीकांत शिंदे निवडून आले.

२०१९ साली श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी निवडुन आले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील उभे होते. त्यांना २,१५,३८० मते मिळाली.

Kalyan Loksabha

या लोकसभेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण,मुंब्रा हे मतदारसंघ येतात. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे, एक आमदार शिवसेनेचा, एक आमदार मनसेचा आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचा निवडुन आला होता.

ज्यामध्ये शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर. याचबरोबर कल्याण ग्रामीण मधून मनसेचे आमदार राजू पाटील. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड. उल्हासनगर मधून कुमार इलानी. डोंबिवली मधून रवींद्र चव्हाण, तर कल्याण पूर्व मधून गणपत गायकवाड आमदार आहेत.

Kalyan Loksabha

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Kolhapur Gokul : भैय्या, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही; सतेज पाटील : सरकार म्हणंल तसंच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घडतंय 

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

SCROLL FOR NEXT