kalyan ganeshotsav
kalyan ganeshotsav 
मुंबई

गणेशोत्सवाबाबत कल्याण-डोंबिवलीतील गणेश मंडळांनी घेतला अनोखा निर्णय

शर्मिला वाळुंज

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करण्यासाठी या वर्षी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. मंडप उभारून सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापेक्षा मंडळातीलच एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी दीड किंवा पाचदिवसीय गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

कोरोना संक्रमणामुळे या वर्षी प्रत्येक सण उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. घरातच साधेपणाने उत्सव साजरे करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने गणपती उत्सवावरही निर्बंध घातले आहेत. लॉकडाऊनमुळे बिघडलेली आर्थिक गणिते, उत्पन्नाचे स्रोत, सामाजिक भान आदी परिस्थितीचा आढावा घेत या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही घरगुती गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळातील एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून त्यांचे ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

टिळकनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी दीड दिवसाच्या घरगुती गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक भाविकास केवळ ऑनलाईन दर्शन दिले जाईल. कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भान जपत मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
- सुशील भावे, अध्यक्ष, 
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

या वर्षी मंडळ वर्गणी गोळा करणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध नियमांची अंमलबजावणी करणेही आवश्‍यक आहे. समाजिक, आर्थिक परिस्थितीचे भान राखता या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवित आहोत. 
- सचिन परदेशी, कार्यकर्ते 
मोरया गणेश उत्सव मंडळ
 

(संपादन : वैभव गाटे )

kalyan dombivali ganesh mandal take decision about ganeshotsav

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT