checkup 
मुंबई

कल्याण-डोंबिवलीत पालिकेने हाती घेतली विशेष मोहीम, कोरोना संशयित रुग्णांना मिळणार वेळीच उपचार

सुचिता करमरकर

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमधील कोव्हिड साथ आटोक्यात यावी यासाठी पालिका प्रशासन विविध संकल्पना राबवत आहे. याच अंतर्गत 'फॅमिली डॉक्टर कोव्हिड फायटर' ही एक नवीन संकल्पना पालिका प्रशासनाकडून राबवली जाणार आहे. फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी येणाऱ्या तापाच्या रुग्णांची या संकल्पनेअंतर्गत अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. पाच-सहा डॉक्टरांचा एक क्‍लस्टर करून नजीकच्या तपासणी केंद्रावर ही तपासणी करण्यात येईल.

फॅमिली डॉक्टरवर रुग्णांचा विश्वास असतो. डॉक्टर आणि रुग्णाचे एक वेगळे नाते या संकल्पनेत तयार झालेले असते. त्यामुळेच फॅमिली डॉक्टरांकडे येणाऱ्या तापाच्या रुग्णांची अशा प्रकारची तपासणी होऊन कोरोना संशयित रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, तसेच त्यांचे अलगीकरण करता येईल. महापौर विनिता राणे यांच्या जुनी डोंबिवली प्रभागात या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. या परिसरातील फॅमिली डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची शास्त्रीनगर रुग्णालयात तपासणी करण्यात आली. 

यावेळी 83 तापाच्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात 34 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शहरातील नगरसेवकांच्या सहकार्याने इतर ठिकाणीही अशा प्रकारची संकल्पना राबविण्यात येईल, असे महापौर विनिता राणे यांनी सांगितले. सर्वपक्षीय नगरसेवक तसेच या दोनही शहरातील फॅमिली डॉक्टर्सनी पालिकेच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

(संपादन : वैभव गाटे)

In Kalyan-Dombivali a special campaign was undertaken by the municipality

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT