kalyan dombivli commissioner troll
kalyan dombivli commissioner troll 
मुंबई

'त्या' व्हिडिओवरून केसीएमसीचे आयुक्त ट्रोल

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समाजमाध्यमावर शहरातील नागरिकांना एका व्हिडीओच्या माध्यमातून संबोधित केले. मात्र मराठमोळ्या कल्याण डोंबिवली शहरात सुर्यवंशी यांनी हिंदीतुन आपले विचार मांडल्यामुळे नागरिकांनी या व्हिडिओला ट्रोल करत आपले संतापजनक मतं व्यक्त केले आहे.

ऐतिहासिक कल्याण शहर आणि सांस्कृतिक उपराजधानी  असलेल्या डोंबिवली शहरात सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने राहतात. येथे सर्व मराठमोळे  सणही पारंपरिक पद्धतीने अजूनही साजरे केले जात आहे. मात्र, समाजमाध्यमावर डोंबिवली पूर्व परिसरात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या ठिकाणी आगमन - प्रस्थान करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून याबाबतची  संपूर्ण माहिती आयुक्तांनी  बुधवारी  सकाळी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना दिली.  
ही माहिती आयुक्तांनी हिंदी भाषेतून दिल्यामुळे कल्याण डोंबिवली करांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समाजमाध्यमावरच आयुक्तांना खडे बोल सुनावले आहेत.

सूर्यवंशी हे  आयुक्तपदी  रुजू झाल्यापासून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मात्र, हिंदीला प्राधान्य दिल्यामुळे हा व्हिडीओ  सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना विचारले असता  शहरात विविध  भाषिक लोकसंख्या असून, मराठी भाषेतील व्हिडीओही लवकर अपलोड करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT