संघर्ष समितीकडून KDMC मुख्यालयासमोर मालमत्ता कराची होळी sakal media
मुंबई

संघर्ष समितीकडून KDMC मुख्यालयासमोर मालमत्ता कराची होळी

कल्याण डोंबिवली महापालिकेने 27 गावातील मालमत्ता करात अवास्तव वाढ केली आहे

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने 27 गावातील मालमत्ता करात अवास्तव वाढ केली आहे. आयुक्तांसोबत वारंवार चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने 27 गाव सर्व पक्षिय हक्क सरंक्षण संघर्ष समितीने मंगळवारी पालिका मुख्यालयासमोर मालमत्ता कराच्या बिलांची होळी केली. गावातील नागरिक मालमत्ता कर भरणार नाहीत, पालिका अधिकारी गावात कर वसुलीसाठी आल्यास त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संपूर्ण त्यांची राहील असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. मनसेनेही समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून

कल्याण डोंबिवली महापालिकेत 2015 ला 27 गावे समाविष्ट करण्यात आली. मात्र ही गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी अशी मागणी संघर्ष समितीची आहे. दोन वर्षांनंतर लागू केलेल्या मालमत्ताकराबाबतही असंतोष निर्माण झाला आहे. मालमत्ता कर हा 10 टक्क्यांनी नाही तर तब्बल 10 पटीने वाढविला आहे. सात वर्षांपासून जी महापालिका 27 गावांत प्राथमिक सोयी-सुविधा देऊ शकत नाही ती महापालिका गावांवर दहापटीने कर कसा आकारू शकते? अवास्तव कराबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करून जाब विचारला होता.

राज्य सरकारकडेही दाद मागितली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. तसेच कर वसुलीसाठी पालिका अधिकारी यांनी सक्ती केल्यास व गावात वसुलीस आल्यास त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची नाही असा इशारा समिती अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी दिला. यावेळी अर्जुनबुवा चौधरी, दत्ता वझे, गजानन मंगरूळकर, प्रकाश भोईर, मनोज घरत, ब्रम्हा माळी, तेजस पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मालमत्ता कर बिल आकारणी योग्य असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. यामुळे संघर्ष समितीच्या वतीने शेकडो नागरिकांसह मालमत्ता कर बिलाची पालिका मुख्यालयासमोर होळी करत महापालिकेचा निषेध करण्यात आला. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्याची भेट घेत निवेदन सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT