मुंबई

कल्याण-डोंबिवलीकरांची उन्हाळ्यातील वणवण थांबणार

रवींद्र खरात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. मात्र तो प्रश्न आता निकाली निघाला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत वाढणारी लोकसंख्या पाहता राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने उल्हास नदीमधून 2026 पर्यंत अतिरिक्त 86 लाख लिटर पाणी उचलण्यास मंजुरी दिल्याने पाणी टंचाईतून दिलासा मिळणार आहे. 

पालिका हद्दीत प्रतिदिन 310 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे 1 जून 2015 पासून पालिकेतील 27 गावांसाठी प्रतिदिन 50 लाख लिटर असा एकूण 360 लाख पाणीपुरवठा प्रतिदिन केला जातो. पालिकेला उल्हास नदीवर 234 लाख लिटर प्रतिदिन पाणी उपसा करण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र, तरीही शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. 

याच पार्श्‍वभूमीवर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि बारवी धरणाची उंची वाढविल्याने उल्हास नदीमधून प्रतिदिन 86 लाख लिटर पाणी प्रतिदिन उचलण्याबाबत पालिका आणि पाटबंधारे विभागात नुकताच करार झाला. 2009 मध्ये नवी मुंबईसाठी मोरबे धरण उपलब्ध झाले.

त्यावेळी नवी मुंबईचे आरक्षित पाणी कल्याण-डोंबिवली शहराला द्यावे, असे आदेश सरकारने दिले होते. मात्र नवी मुंबई पालिकेने आपले हक्काचे पाणी सोडला नाही. तेव्हा पाटबंधारे विभागासोबत करार न झाल्याने हा विषय बाळगला होता. आता 11 वर्षानंतर हा विषय मार्गी लावण्यात पालिकेला यश आले आहे. 

पाठपुराव्याला यश ... 
मागील दोन वर्षांपासून पाणी समस्येवर शहरात विविध आंदोलने झाली होती. उल्हास नदीमध्ये पाणी असताना शहरात पाणी समस्या कशी, यासाठी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी विविध विभाग आणि पालिका पाणी पुरवठा विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या पथकाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

पाटबंधारे विभागासोबत नुकताच एक करार झाला. त्यानुसार 1 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत उल्हास नदीमधून अतिरिक्त 86 लाख लिटर पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे. 27 गावात राज्य सरकारच्या अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करण्यात येणार असून ती प्रत्यक्षात येईपर्यंत एमआयडीसी पाणी पुरवठा करणार आहे. त्यांनाही प्रतिदिन पालिकेच्या नावाने मंजूर 105 लाख लिटर पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे. 
- राजीव पाठक 
कार्यकारी अभियंता 
केडीएमसी, पाणी पुरवठा विभाग 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT