Women Fighting sakal
मुंबई

Kalyan Crime : दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर चौकातच एकमेकींना मारहाण

कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकामध्ये तुफान राडा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकामध्ये तुफान राडा झाला आहे. यावेळी दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी करत भर चौकातच एकमेकींना मारहाण सुरू केली. तब्बल वीस मिनिटं ही हाणामारी सुरू असून वाहतूक पोलीस व पोलिसांच्या मदतीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा श्री. तिसाई माता पूल (पत्रिपुल) ते दुर्गाडी किल्ल्याला जोडणारा गोविंद बायपास रोडवर आज सायंकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान दोन दुचाकी वाहनाची धडक झाली. या धडकेनंतर चुकी कोणाची हे न पाहता दोन्ही वाहन चालकांमध्ये भर रस्त्यातच तुडुंब हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे हे ट्रॅफिक पोलिसांसमोर झाले.

वाहन चालकाची हाणामारी होत असताना त्यांच्या पाठी बसलेल्या दोन्ही महिलाही आपसामध्ये एकमेकींना भिडल्या. मग काय वाहन चालक या महिलांची भांडण सोडवण्यासाठी इतर प्रवासी प्रयत्न करू लागले. ही फ्री स्टाईलमध्ये सुरू असलेली हाणामारी तब्बल वीस मिनिटं सुरू होती. महिलाची हाणामारी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती.

घडलेला प्रकाराची माहिती एका वाहतूक पोलिसाने ही बाब महिला अंमलदारांना  कळवले. माहिती मिळतात महिला अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणत वाहतूक कोंडी सुरळीत केली. ही फ्री स्टाईलची हाणामारी प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून, सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT