मुंबई

प्रिन्सीच्या हत्येचा मुख्यपूरावा मिळाला

सकाळ वृत्तसेवा


कल्याण : आंतरधर्मीय विवाहास विरोध केल्यामुले २२ वर्षीय प्रिन्सी तिवारी हिची तिच्या वडिलांनीच निर्घृण हत्या केली होती. हत्येसाठी आरोपी पिता अरविंद तिवारी याने वापरलेला चाकू हस्तगस्त करण्यात महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, तरुणीच्या शरीराचा उर्वरित अर्धवट मृतदेह शोधण्यात बुधवारी पोलिसांना यश आले असले, तरी तिच्या डोक्‍याचा शोध शुक्रवारीदेखील सुरू होता.

अरविंद तिवारी (४७, रा. इंदिरानगर, टिटवाळा) याला आपलीच मुलगी प्रिन्स हिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, कोठडीत आरोपी अरविंद तिवारी याची पोलिस कसून तपासणी करत आहेत. आरोपी अरविंद हा मुलगी प्रिन्सी तिवारी (२२) हिच्या प्रेमसंबंधांवरून मागील १० ते १५ दिवस तणावात होता.

गुरुवारी (ता. ५) दोघांत भांडण झाल्यानंतर रात्री उशिरा त्याने मुलगीची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने घरात २४ तास मृतदेह ठेवून शुक्रवारी रात्री धारदार चाकूने मृतदेहाचे तीन तुकडे केले होते. डोके आणि अर्धवट धड हे शनिवारी (ता. ७) ११ वाजता दुर्गाडीजवळील कल्याण खाडीत फेकून दिले होते. त्यातील धड शोधण्यात पोलिसांना यश आले असले, तरी डोक्‍याचा शोध आजही सुरू होता.

मृतदेहाचे तुकडे करून चाकू जमिनीत पुरला
आरोपी अरविंद याने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून तो चाकू राहत्या घराच्या बाजूला जमिनीत पुरला होता. पोलिसांनी शस्त्रांबाबत विचारले असता सुरुवातीला वेगवेगळी उत्तरे तो देत होता; मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने चाकू घराजवळ पुरल्याचे सांगितले. गुरुवारी महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने तो चाकू हस्तगत केला. मुलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला जास्तीत जास्त सजा व्हावी, यासाठी पोलिसांनी सबळ पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT