BJP Minister Ravindra Chavan esakal
मुंबई

Kalyan Politics : शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडी सुरूच; मंत्री चव्हाणांनी शिवसेना प्रमुखांना सुनावले खडेबोल

लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेना व भाजप (BJP) यांच्यातील कुरघोडी स्थानिक पातळीवर अजूनही सुरूच आहे.

शर्मिला वाळुंज

कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या ठरवाबाबत बोलताना या ठरावाबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेना व भाजप (BJP) यांच्यातील कुरघोडी स्थानिक पातळीवर अजूनही सुरूच आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) या कुरघोडीवर बोलताना भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता शिवसेना शहर प्रमुखांना खडेबोल सुनावले आहे.

टीआरपी कसा वाढेल त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. मात्र, आता टीआरपीचा खेळ बंद झाला आहे. वरिष्ठ निर्णय घेतील व तो पदाधिकारी यांना मान्य करावा लागतो, असेही त्यांनी शिवसैनिकांना सूचित केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी मोदी @9 या मोहिमेंतर्गत डोंबिवली शेलार नाका परिसरात घरोघरी जावून नागरिकांची भेट घेत सरकारची कामे सांगितली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री चव्हाण यांनी मोदी सरकारच्या केंद्र आणि राज्यातील विकास कामाची व विविध योजनांची माहिती दिली.

याच दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील सुरू असलेले शीतयुद्ध. डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर केलेला दावा याबाबत रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारले. यावर मंत्री चव्हाण यांनी नाव नं घेता टीआरपीचा खेळ बंद करा, अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुखांना फटकारलं.

मंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात येत्या 2024 मध्ये एनडीएचे सर्व उमेदवार जिंकून आणणे, त्यानंतरच्या काळात शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार जिंकून आणणे ही आमची प्राथमिकता आहे. सर्व ठिकाणी टीआरपीचा मोठ्या प्रमाणात खेळ सुरू झालाय. प्रत्येकाला असं वाटतंय माझा टीआरपी कसा वाढेल. मग, त्यासाठी प्रत्येकजण हा प्रयत्न करतोय.

तर, कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या ठरवाबाबत बोलताना या ठरावाबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभेवर दावा करण्यात आल्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चव्हाण यांनी शिवसेना-भाजप युतीमधील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. यामुळे यानंतरच्या बाबतीत टीआरपीचा खेळ संपला असे मी घोषित करतो, असेही संगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT