Kalyan Loksabha sakal
मुंबई

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Voters are confused as there is no name in the voter list; कल्याण लोकसभा...

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक आणि मतदार हैराण झाले आहॆत. सकाळपासून मतदान करण्या करता मतदार हा बाहेर पडला होता.

\मात्र 11चे ऊन डोक्यावर चढले तरी मतदार यादीत नावच सापडत नसल्याने नागरिक संतापले होते. प्रभागातील माजी नगरसेवकांकडे मतदारांनी तक्रार करण्यास सुरुवात करताच अनेक ठिकाणी माजी नगरसेवक, नगरसेविका बुथवर उतरून नाव शोधण्याचे काम करू लागले.

परंतु नाव सापडतच नसल्याने प्रशासनाचा हा सगळा भोंगळ कारभार असल्याने आज त्याचा फटका मतदारांना बसला असल्याचे मत माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी व्यक्त केले.

डोंबिवली विधानसभा क्षेत्रात सकाळ पासूनच लोकसभा मतदान प्रक्रियेस सुरवात झाली होती. उन्हाचा त्रास नको म्हणून सकाळीच अनेकांनी घराबाहेर पडत मतदान केंद्र गाठण्यास सुरवात केली.

मतदान केंद्राच्या जवळील बुथवर जाऊन मतदार यादीत नागरिक आपलं नाव शोधू लागले. मात्र सकाळी 8 पासून ते 11 वाजत आले तरी नाव सापडत नसल्याने नागरिक हैराण झाले. नाव मिळत नसले तरी मतदार तेथेच घुटमळत होते. अखेर दुपार झाल्याने त्यांनी माघारी घरी जाणे पसंत केले.

घरातील काही लोकांची नाव आहेत तर काही लोकांची नाव नसल्याने नागरिक संतापले होते. दरम्यान नागरिकांना मदत करण्यासाठी माजी नगरसेवक बाहेर पडले असून भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांनी प्रशासनला दोषी धरले आहॆ.

धात्रक म्हणाले, प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. मुलाचं नाव आहे तर आईचं नाव नाही. यादी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. यादीमध्ये पण नाव नाही. ऑनलाइन पण सापडत नाही. घरामधल्या तीन जणांचे नाव आहे. तर बाकीच्यांचे नावच नाही. डोंबिवलीत 20 टक्के लोकांचे नावच मिळत नाहीये. नावाच्या अक्षरांत चुका केल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT