Kalyan News: sakal
मुंबई

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan News: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकासकामे ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचे सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केले.

तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे. तो अधिकार आपण सर्वांनी बजावावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर, भाऊ प्रभूनाथ भोईर, सुप्रिया प्रभूनाथ भोईर, वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबीयांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईत २४ तासांत ३०० मिलीमीटर पावसाची नोंद

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT