मुंबईः गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर सध्या गर्डर टाकण्यात येत आहे. गर्डर टाकण्याच्या कामाला बुधवारी रात्री 10 वाजता कामाला सुरुवात झाली. 24 ऑगस्टपर्यंत काम सुरू असणार आहे. पत्रीपुलाच्या अंतिम टप्यात कामाला सुरुवात झाली असून आगामी एक ते दीड ते महिन्यात वाहतुकीला पत्रीपुल उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान गर्डर टाकत असताना पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामंडळानं रात्री १० ते पहाटे ५ ही निवडली आहे. येत्या सोमवारपर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. त्यामुळे या काळात पुलावर रात्रीच्या वेळी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वेळेत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे.
रस्ते विकास महामंडळमार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रीपुल पाडून नव्यानं पत्रीपुल बनविण्याचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. २०१८ ला पुल तोडल्यानंतर या पुलाचं काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, अशी आश्वासने राजकीय नेत्यांकडून देण्यात येत होती. प्रत्यक्षात गेल्या दीड वर्षांपासून या पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे कल्याण शहरात वाहतुकीची समस्या वाढू लागली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत या पुलाच्या कामानं चांगला वेग पकडला होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या पुलाचं काम बंद करण्यात आले होते. आता पुन्हा या पुलाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली असून सध्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.
सोमवापर्यंत रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी एक मोठी क्रेन जुन्या पुलावर उभी केली जाणार आहे. या वेळेत कल्याण-शीळ मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना रांजनोली नाक्यावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. सोमवार २४ ऑगस्टपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी हे बदल लक्षात घेऊन प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी केले.
नवीन पत्रीपुलाची लांबी 110 मीटर असून पुलाची रुंदी 11 मीटर आहे . पुलाच्या कामात ओपन वेब स्ट्रील गर्डर 77मीटर असून सेमी थ्रू टाईप स्टील गर्डर 33 मीटर, 1200 मी मी व्यासाचे 22 नग पाईल फाउंडेशन 3 नग ( 2 अब्रुटमेंट आणि 1 पियर ) आहे तर 22 पैकी 5 पाईल पूर्ण , 5 पाईलचे काम प्रगतीपथावर असून हैद्राबाद येथे रेल्वे मार्फत मंजूर असलेल्या कार्यशाळेत पुलाच्या कामात ओपन वेब स्ट्रील गर्डर 77 मीटर असून सेमी थ्रू टाईप स्टील गर्डर 33 मीटरचे काम करण्यात आले आहे .आता हे काम अंतिम टप्यात आहे आणि नवीन पत्रीपूल पूर्ण झाल्यास कल्याण डोंबिवलीकरांना मोठ्या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येणार आहे.
Kalyan Patri Pul Work No Entry Night 10 To Morning 5
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.