Kalyan sakal
मुंबई

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Mothagaon - Mankoli| शिवसेना युवा सचिव दीपेश म्हात्रे यांची मागणी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali : घाटकोपर येथील होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही प्रमाणात अनधिकृत होर्डींगवर कारवाई होत असली तरी प्रशासन त्यात दुजाभाव करत असल्याचे दिसते. ठाणे व डोंबिवली जोडणाऱ्या मोठागाव माणकोली उड्डाणपुलाला लागून नवीन मोठमोठे होर्डींग उभारण्यात आले आहेत.

यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनधिकृत होर्डींगवर कारवाई करा अशी तक्रार युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी एमएमआरडीएकड़े केली आहे.

ठाणे ते डोंबिवली हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करण्यास उपयुक्त असलेल्या मोठागाव माणकोली पुलाला वाहनचालक पसंती देत आहेत. या मार्गावरील वाहतूक वाढली असून आजूबाजूला खाडी किनारी गृहसंकुले देखील उभी रहात आहेत.

याचा फायदा घेत याठिकाणी मोठ मोठे अनधिकृत होर्डींगचे साचे उभारत त्यावर जाहीराती झळकवून लाखोंची कमाई केली जात आहे. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले गेले आहेत.

मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे. या परिसरात सर्रासपणे अनधिकृत होल्डिंग उभे केले जातं असल्याचे समोर येत आहे. या अनधिकृत होल्डिंगवर कुठलीच कारवाई होत नसल्याने मोठी जीवित आणि होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की कोणतीही परवानगी न घेता भल्ले मोठे जाहिरातीसाठी होल्डिंग उभारले गेले आहेत. या होर्डिंगमुळे भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहॆ.

या होर्डिंगबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात घाटकोपर मध्ये होर्डिंग पडून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आणि यानंतर राज्यात सर्वीकडे अशी दुर्घटना घडू नये म्हणून शासना कडून कठोर पाऊल उचलले जातं असताना माणकोली पुलावर अश्या प्रकारे सरासपणे लावले जाणारे होर्डिंगॉवर एमएमआरडीए अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

IND vs SL: श्रीलंकन खेळाडूशी धडक, केएल राहुलचा कॉलचा गोंधळ अन् यशस्वी जैस्वाल रनआऊट! गॉलमध्ये ड्रामा...पाहा Video

SCROLL FOR NEXT