crime news esakal
मुंबई

Kandivali Student Molestation: मुंबईत शिक्षकाकडून 11 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग; मुख्याध्यापकानं केली तक्रार, गुन्हा दाखल

जुलै महिन्यात कांदिवलीतील एका शाळेत विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंगाचा प्रकार घडला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलै महिन्यात घडलेल्या याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून आरोपीसह पीडित विद्यार्थीनी, मुख्याध्यापक आणि तिच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

काय आहे घटना?

जुलै महिन्याच्या शेवटी कांदिवलीतील एका शाळेत हा विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंगाचा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती पीडित विद्यार्थीनीनं स्वतःच शाळेच्या मुख्याध्यापकांकडं केली होती. यानंतर बुधवारी याप्रकरणी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यध्यापकांची भूमिका महत्वाची

कांदिवली पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीनं मुख्याध्यापकांना सांगितलं की, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस जेव्हा वर्ग संपला तेव्हा तीला शाळेतील एका शिक्षकानं वर्गाबाहेर बोलावून घेतलं आणि तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. यानंतर मुख्याध्यापकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पीडित विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन पोक्सो अॅक्ट अंतर्गत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, कांदिवली पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून त्याला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि पीडित मुलीच्या पालकांचा देखील जाबाब नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai -Bangalore New Train : मुंबई -बंगळूर आणखी एक रेल्वे धावणार; सांगली, मिरजेतून प्रवास, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांना फायदा

महाराष्ट्र सरकार आणि रॅपिडोचा ऐतिहासिक करार! कॅप्टन आता 'माहिती दूत' बनणार; नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणार

मोठी बातमी: १७८८ सामन्याचं वेळापत्रक BCCI कडून जाहीर; २३ ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी... जाणून घ्या डिटेल्स

Pune Andekar Gang Case : पुणे बालाजीनगर गोळीबार प्रकरणात अखेर आंदेकर टोळीवर गुन्हा; अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघड?, आरोपींचा शोध सुरू

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११९१ अप्रेंटिस पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

SCROLL FOR NEXT