मुंबई

कांदिवली: चोरीच्या आरोपावरुन दोघांना अर्धनग्न करुन धिंड, पाच जण अटकेत

पूजा विचारे

मुंबईः  कांदिवलीमध्ये चोरीच्या आरोपावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पाच जणांनी मिळून या दोघांना बांधून चाबकानं फटके दिल्याचं समजत आहे. तसंच धक्कादायक म्हणजे यांची अर्धनग्न धिंडही काढली आहे. 

आरोपींनी त्या दोघांना अर्ध नग्न करून  त्याचे मुंडन केलं आणि त्यानंतर त्यांची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या  घटनेची गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. कांदिवलीच्या जनता काँलनी, काच पाडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

एक मोबाइल आणि ३ हजार रुपये चोरीला गेल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याचं समजतंय. त्यामुळे या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चोरीच्या संशयावरून आरोपींनी दोघांची वाजत गाजत धिंड काढली. एवढंच नाही तर त्याचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. कांदिवली पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Kandivali theft Allegations two beat five arrested viral video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT