मुंबई

'हे वागणं म्हणजे बाबर सेनेसारखं'; कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचलं

तुषार सोनवणे
मुंबई - राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने आज राज्यभर लाक्षणिक आंदोलन केले. त्यावर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील पत्रव्यवहारावरही राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौतने या प्रकरणात उडी घेतली आहे.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदूत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जून महिण्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा केली होती. त्यानुसार टप्प्याटप्याने राज्यात व्यवहार सुरू होत आहेत. परंतु राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवल्याने त्याठिकाणीच्या हातावर पोट असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. त्यामुळे भावना आणि अर्थकारणाच्या मुद्यावर राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने आज राज्यभर आंदोलन केले. राज्यपाल  भगतसिह कोश्यारी य़ांनीही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले. त्याला मुख्यमंत्र्यांनीही तेवढेच चोख उत्तर दिले.परंतु या वादात कंगनाने उडी घेतली आहे. तीने एक ट्विट केले ज्यात म्हटले आहे की, माननीय राज्यपाल महोदयांनी गुंड सरकारला प्रश्न विचारला ते बरं झालं. या गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट्स उघडले परंतु मंदिरे मात्र पद्धतशीरपणे बंद ठेवली. सोनियासेना ही बाबर सेनेपेक्षा अधिक वाईट वागत आहे.

कंगनाने शिवसेनेला बाबरसेनेची उपमा देऊन पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कंगनाच्या पीओके प्रकऱणात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. तशीच भूमिका पुन्हा घेतली जाते का यावर नेटकरी व्यक्त होत आहेत.

-----------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT