मुंबई

''माझ्या कोणत्याही ट्विटमुळे हिंसाचार नाही'', कंगनाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा

- सुनीता महामुणकर

मुंबई: माझ्या कोणत्याही ट्विटमुळे  हिंसाचार झालेला नाही आणि त्यातून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी हेतू सिद्ध होत नाही, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वतीने सोमवारी करण्यात आला.

वांद्रे न्यायालयाने कंगनाच्या काही ट्विट विरोधात फौजदारी फिर्याद नोंदविण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. याविरोधात कंगनाने एड रिझवान सिद्दीकी यांच्या मार्फत न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर न्या एस.एस.शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. 

वांद्रे न्यायालयाने दिलेला गुन्हा दाखल करण्याचा निर्णय चुकीच्या आधारांवर आधारित आहे. माझ्या ट्विटमध्ये कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरुपाचे नाही. तसेच त्यातून हिंसाचार, अशांतता निर्माण झाली नाही, असा युक्तिवाद एड सिद्दीकी यांनी कंगनाच्या वतीने केला. ट्विट केल्यानंतर असे काही घडले नाही त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने तपासण्यात आले आहेत, असा युक्तिवाद करण्यात आला.

फिटनेस ट्रेनर मुनावर अली यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात तक्रार नोंदवली आहे. कंगनाने मुंबई पोलिस आणि मुंबईबाबत काही ट्विट केले. ज्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येत आहे असा आरोप केला आहे.

येत्या 26 तारखेपर्यंत कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. कंगनाच्या ट्विट विरोधात अन्य न्यायालयातही तक्रारी दाखल आहेत.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

kangana ranaut sedition case no violence because of my tweets Bombay High Court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT