मुंबई

मुंबई पालिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत कंगनानं घेतला मोठा निर्णय

पूजा विचारे

मुंबई:  अभिनेत्री कंगना राणावतनं  खारमधील राहत्या फ्लॅटबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. 

बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेत रितसर अर्ज करण्याची मुभा आहे. 
दरम्यान बीएमसीला कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. जर पालिकेचा निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर त्या आदेशाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आलेत. 

सत्र न्यायालयानं दिलासा नाकारताच कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपण बीएमसीविरोधातील खटला मागे घेत आहे. नागरी संस्थेशी बोलून हे बेकायदा बांधकाम प्रकरण सोडवले जाईल, असं आज कंगनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

३ फेब्रुवारीला खार येथील फ्लॅटचं बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी न्यायालयानं कंगनाला दिलासा दिला. मार्च 2018 मध्ये बीएमसीनं कंगनाला खारमधील तीन फ्लॅट एकत्र विलीन केल्याबद्दल नोटीस बजावली होती. डिसेंबर 2020 मध्ये बीएमसीच्या नोटीसविरोधात कंगनाची याचिका दिवाणी कोर्टानं फेटाळली आणि त्यानंतर कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली. कंगनाची याचिका नाकारली आणि दिवाणी कोर्टानं म्हटलं की, परवानगीशिवाय तीन फ्लॅट विलीन करणं बेकायदेशीर आहे.

Kangana Ranaut withdraw plea against BMC civil court Khar residential home

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT