Kanhoji angre island sakal media
मुंबई

कान्होजी आंग्रे बेट विकास वर्षभरात पूर्ण होणार; मुंबई पोर्ट ट्रस्टची माहिती

कृष्ण जोशी

मुंबई : सागरमाला योजनेअंतर्गत (sagarmala yojana) कान्होजी आंग्रे दीपस्तंभ बेटाचा (kanhoji angre island) पर्यटनदृष्ट्या विकास होत असून वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होईल, तसेच मॅलेट बंदरातही मोठा मच्छिमार धक्का बांधला जाईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai port trust) प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा (Rajiv jalota) यांनी दिली. भारताचा बंदर विकास कार्यक्रम - सागरमाला प्रकल्पाला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांनी नुकतीच पत्रकारांना माहिती दिली.

क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, दीपस्तंभ पर्यटन योजनेअंतर्गत कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करण्यात येत आहे. हे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत येथे पर्यटकांसाठी १८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. येथे ट्रेकिंग, बसण्याच्या जागा, प्रेक्षक मार्गिका, वेलींचे आणि लाकडाचे मांडव, आराम करण्यासाठी बाके, खुले उपहारगृह, गाणी आणि इतर कलांचे कार्यक्रम, निवासी शिबीर या सोयी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.

मॅलेट बंदर विस्तार

मॅलेट बंदरावरील धक्क्यावर दररोज साधारणपणे ७०० ट्रॉलर्स येतात. अनेकदा ही संख्या ९०० पर्यंतही पोहोचते व लवकरच ही संख्या १,३०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मासेमारी बंदर स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे काम दोन वर्षात पूर्ण होईल, त्यामुळे मच्छिमारांच्या वाढत्या व्यवसायाला साह्य होईल. याशिवाय पिरापाऊ इथे रासायनिक पदार्थांची वाहतूक करणारा तिसरा धक्का बांधला जाणार असून, त्याद्वारे, एलपीजी सारख्या रसायनांची वाहतूक करता येईल, अशीही माहिती जलोटा यांनी दिली.

सागरमाला हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम असून, भारताच्या दळणवळण क्षेत्रात मोठा बदल घडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. भारताचे किनारे आणि जलमार्गांच्या क्षमतेचा संपूर्ण उपयोग करुन घेण्यासाठी यात अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. सागरमाला योजनेत, एकूण साडेपाच लाखकोटी रुपयांचे प्रकल्प आहेत. त्यापैकी ९९ हजारकोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले असून २.१२ लाख कोटी रुपयांच्या २१७ प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT