Kapil Patil  esakal
मुंबई

Kapil Patil : बदलापूर ग्रामीणमधील ग्रामस्थांबरोबर कपिल पाटील यांनी साधला संवाद

शहरातील कॉर्नर सभांना नागरिकांची गर्दी

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बदलापूर नजीकच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विविध भागातील ग्रामस्थांबरोबर शनिवारी संवाद साधला. त्यानंतर बदलापूर शहरात कॉर्नर सभा घेऊन नागरिकांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कपिल पाटील यांनी बदलापूरच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. वडवली, साई, ढोके दापिवली, आंबेशिव, भोपीपाडा, चोण, राहटोली, जांभिलकर, मुळगाव, सोनावळे, कान्होर, काराव, भूइसावरे येथील ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी कपिल पाटील यांनी बदलापूर शहरातील एरंजाड येथील नागरिकांबरोबरही संवाद साधला. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे, पंकज मेहेर, समीर मेहेर, जितेंद्र मेहेर आदींसह ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

बदलापूर शहरातील दत्तवाडी येथे शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, वॉर्ड क्र. २ मध्ये समाजसेवक बंटी म्हसकर, भाजपाच्या माजी नगरसेविका वैशाली गिते व प्रदिप गिते यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, बदलापूर पूर्वचे अध्यक्ष संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली आदी उपस्थित होते.बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचारसभेला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडून देण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT