Congress-and-Janata-Dal
Congress-and-Janata-Dal 
मुंबई

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा मुंबईतील हॉटेलमध्‍ये मुक्‍काम

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयाला राजीनामा सुपूर्द करणारे १० आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काँग्रेसचे १० आणि जनता दलाच्या दोन आमदारांनी आज राजीनामे दिले. त्यातील १० जण मुंबईत मुक्‍कामी आहेत. वांद्रे परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने येथे बंडखोर आमदार सुरक्षित असतील, असा विश्‍वास कर्नाटकातील बंडाचे सूत्रधार येडियुराप्पा यांना आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दलाच्या ११ आमदारांनी राजीनामे देण्याच्या घटनेचा परिणाम स्पष्ट आहे. भाजपने या सर्व घडामोडींबद्दल मौन बाळगले असले, तरी काही दिवसांपासून या मोहिमेला मुंबईतून बळ मिळाले. गेले सात ते आठ महिने बंडखोर कानडी आमदारांचे आदरातिथ्य भाजपमध्ये नव्याने प्रवेशलेला एक नगरसेवक युवा पदाधिकाऱ्यांच्या मदतीने करत असे. काँग्रेसनेही या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या आमदारांच्या येण्या-जाण्यावर काँग्रेस बारकाईने लक्ष ठेवून असे. कर्नाटकातील काही आमदार भाजपने गळाला लावले असून ते मुंबईत मुक्‍कामाला असल्याची माहिती सर्वप्रथम मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना पाठवली होती. त्यानंतर कर्नाटकातील संकटमोचक शिवकुमार यांनी जद काँग्रेस संयुक्‍त सरकारला तारले होते. आज बाहेर पडलेल्या आमदारांशी भाजपने मुंबई मुक्‍कामात संपर्क साधला होता, असे आता स्पष्ट झाले आहे; मात्र भाजपने त्याबाबत मौन बाळगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT