tata amantra 
मुंबई

कोरोना झालाय? मग क्वारंटाईन सेंटरमध्ये सोबत बेडशीट, झाडू घेऊन जा! 

मयुरी चव्हाण काकडे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दररोज 200 च्यावर रुग्णांची नोंद होत आहे. त्यापैकी सौम्य लक्षणे असलेले कोरोना बाधित रुग्ण आणि क्वारंटाईन केलेल्या काही व्यक्तींची सोय केडीएमसीने भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा इमारतीत केली आहे. मात्र, अपुऱ्या जागेमुळे काही कोरोना बाधित रुग्णांना चक्क जमिनीवर झोपावे लागत आहे. याबाबत केडीएमसी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनीही सदर परिस्थिती खरी असल्याचे मान्य केले आहे. इतकेच नाही तर रुग्णांना साफसफाईसाठी घरातून झाडू, बेडशीट आणि इतर आवश्यक सामग्री मागवावी लागत आहे. 

टाटा आमंत्रा येथे दाखल करण्यात आलेल्या बहुतांश  रुग्णांना सर्व सोयींची तजवीज स्वतः करावी लागत आहे. दाखल झाल्यावर गादीवर असलेली चादरही आठवडाभर बदलण्याची तसदी घेतली जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. रुग्णांना वारंवार गरम पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून दिला जातो. मात्र, टाटा आमंत्रा येथे गरम पाणी करण्यासाठी घरूनच मशीन घेऊन या असा सल्ला रुग्णांना दिला जात आहे. याबाबत काही रुग्णांनी 'सकाळ'कडे तक्रार केली असून गरीब रुग्ण पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक शेगडी कुठून आणणार? असा सवाल रुग्णांनी उपस्थित केला आहे.  

खोलीची दररोज साफसफाई करून बेडशीट बदलावी लागते, आंघोळीची सोय नाही, प्यायला गरम पाणी नाही, खाटेअभावी जमिनीवर गादी टाकून  झोपावे लागत आहे, अशा एक ना अनेक तक्रारी  रुग्णांनी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनो! जर तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत तर तुम्ही  टाटा आमंत्रा येथे दाखल होण्यापूर्वी सोबत झाडू, बेडशीट, इलेक्ट्रॉनिक शेगडी या सर्व वस्तूंची तजवीज करा, असे म्हणण्याची नामुष्की ओढावली आहे.  याबाबत पालिकेने टाटा आमंत्रा येथे केडीएमसीने नियुक्त केलेले आरोग्य कर्मचारी मनोहर गोवेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर परिस्थिती असल्याचे मान्य करत रुग्णांची संख्या वाढल्याने काही रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे मान्य केले आहे. 


आमच्या खोलीची सफाई आम्हीच करतो. आम्ही दाखल झाल्यापासून आहे तीच बेडशीट आहे. मी झाडू, बेडशीट व येथील प्रशासनाने दिलेल्या सल्ल्यानुसार गरम पाण्याची मशीनही मागवून घेतली आहे. पण बिकट परिस्थिती असलेले रुग्ण सोयीसुविधांअभावी आणखी आजारी पडतील. 
- उपचार घेत असलेले रुग्ण, टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT