Dombivali Road sakal media
मुंबई

डोंबिवली : रस्त्यासाठी 1 कोटीचा निधी; 'या' रस्त्याची होणार पुनर्बांधणी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील (Dombivali west) ह प्रभागक्षेत्र ते मानकोली उड्डाणपूल रस्त्याची (Mankoli bridge reconstruction) दुरावस्था झाली होती. वर्दळीच्या या रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) 1 कोटी निधी मंजूर (one crore fund) केला असून बुधवारी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी व्यक्त केला.

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालय ते मोठागांव मानकोली उड्डाणपूल हा रस्ता वाहतुकीच्या आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता आहे. 2014 साली रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था झाली होती. तसेच रस्त्याच्या खालील जलवाहिनी, मल निस्सारण वाहिनीचे काम झाले होते. यामुळेही रस्ता खराब झाला होता. या भागात रविवार, बुधवार आणि शुक्रवार असा बाजार भरतो. मच्छिमार्केट देखील येथे असल्याने रहदारी असते.

ठाकुर्ली उड्डाणपूल मार्गे नवापाडा, उमेशनगर, मोठागांव, जुनी डोंबिवली या भागात येणारी वाहने याच रस्त्यावरून येत असल्याने या रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी यासाठी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हे पाठपुरावा करीत होते. स्थायी समिती सभापती असताना त्यांनी या रस्त्यासाठी निधीची तरतूद देखील करून ठेवली होती. या कामास कल्याण डोंबिवली महापालिका बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून 1 कोटीचा निधी ही मंजूर केला आहे.

या रस्त्याच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ बुधवारी दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयेश म्हात्रे, गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे, पवन म्हात्रे, परेश म्हात्रे आदी उपस्थित होते. तीन प्रभागांचा असलेल्या या रस्त्याचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. काही नगरसेवक केवळ आश्वासन देतात पण काम मात्र शिवसेना करते असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT