मुंबई

''वरळी बीडीडी पुनर्विकासातील नवीन टॉवरच्या उंची कमी ठेवा''

तेजस वाघमारे

मुंबई: राज्य सरकारने म्हाडामार्फत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. मात्र राज्य सरकारने वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आराखडा नव्याने तयार करण्यासाठी समिती गठीत केली आहे. नवीन आराखड्यात वरळी बीडीडी पुनर्विकासातील नवीन टॉवरच्या उंची 32 मजल्यांपेक्षा कमी ठेवावी, जेणेकरून रहिवाशांना दहा वर्षांनंतर मेंटनान्स भरणे सोईचे  होईल, अशी मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित न करता त्यांना थेट पुनर्विकास इमारतीत स्थलांतरित करणे शक्य आहे काय, याबाबत सरकारने समिती गठीत केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. नवीन आराखड्यात पुनर्विकास सदनिका 45 मजल्याहून अधिक उंचीच्या राहिल्यास भविष्यात रहिवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे समितीने रहिवाशांच्या भविष्यचा विचार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

वरळी बीडीडी चाळीचा पहिला आराखडा रद्द होऊन दुसरा आराखडा तयार होत आहे. यामध्ये इमारतीची उंची 30 मजलयांहून अधिक नसावी जेणेकरून रहिवाशांना मेंटेनन्स भरणे सोईचे व्हावे, सरकारची 10 वर्ष मेंटनान्स फ्री योजना आहे. पण नंतर लोक घरे विकून जाऊ नयेत यासाठी किमान 10 लाख कॉर्पस फंड जाहीर करावा, अशी मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT