मालाडमध्ये घरोघरी वाटप केलेली खिचडी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे.  
मुंबई

मुंबई पालिकेची खिचडी काही शिजत नाही...!

सकाळ वृत्तसेवा

मालाड : मुंबई महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी गरजूंना तयार अन्न दिले जात आहे; मात्र काही ठिकाणी हे अन्न निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहे. पालिकेच्या मालाड पी उत्तर विभागातर्फेही परिसरात खिचडी दिली जात आहे; मात्र तिचा दर्जा खराब असल्याने अनेक जण ती फेकून देत असल्याची तक्रार पालिका आयुक्त आणि पी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्थानिकांनी केली आहे. 

मालाडमध्ये प्रत्येक नगरसेवकाच्या माध्यमातून गरजूंना खिचडी देण्यात येत आहे; मात्र यातील तांदूळ कच्चे, मीठ आणि तिखटाचे प्रमाण अधिक असल्याने नागरिक ती फेकून देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत स्थानिक संतोष चिकणे यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे.

काही दिवसांपूर्वी याबाबत पालिका सहायक आयुक्तांनी कंत्राटदाराला समज दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी कंत्राटदाराने राजमा भात दिला; मात्र एकच दिवस दाखवण्यापुरते चांगले अन्न दिल्यानंतर पुन्हा निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सध्या मुस्लिम बांधवाचा रोजा सुरू आहे. येथील प्रभाग क्रमांक 33 मध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो. त्यामुळे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अन्न दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काही वेळेस रात्री 9 वाजता जेवण आल्याने लोकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सकाळी 7 वाजता शिजलेले अन्न दुपारी 2-3 वाजता मिळते. त्यामुळे ताजे अन्न त्यांना मिळत नाही. यासाठी पालिकेने प्रभागातच किचन सुरू करावे, या कामात स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्था आवश्‍यक मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

बदल केवळ तात्पुरते 

  • पालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी रमजाननिमित्त नागरिकांची योग्य काळजी घेत असल्याचे म्हटले आहे. यानिमित्त त्यांना खिचडीऐवजी अधुनमधून चपाती भाजी, राजमा भात व बिर्याणीही देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे;
  • तर तक्रारदार संतोष चिकणे यांनी अधिकरी लक्ष देतात तेव्हा तात्पुरते बदल केले जातात; मात्र पुन्हा निकृष्ट अन्नच पुरवले जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अन्नाच्या दर्जाबाबत काटेकोर लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT