Kirit-Somaiya Sakal
मुंबई

सोमय्यांच्या अडचणी वाढणार? 'ते' पैसे राज्यपालांकडे पोहोचलेच नाहीत

२०१३-२०१४ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यात किरीट सोमय्यांनी पत्रकार परीषद घेतली होती. Kirit Somaiya

सकाळ डिजिटल टीम

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर सोमय्यांशी निगडीत काही प्रकरणं बाहेर आली. नील सोमय्या तसेच वाधवान कुटुंबीय यांचे आर्थिक संबंध असल्याचे पुरावे देण्यात आले. यानंतर सोमय्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी महिती समोर आली आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे.

२०१३-२०१४ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यात किरीट सोमय्यांनी पत्रकार परीषद घेतली होती. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा लिलाव करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला होता. मात्र, या युद्धनौकेला ऐतिहासिक दर्जा मिळावा, यासाठी किरीट सोमय्यांनी मागणी केली. त्यांनी विक्रांतला वाचवण्यासाठी ठिकठिकाणी फंड्स उभे केले.

त्यामार्फत गोळा झालेले पैसे राज्यपाल कार्यालयाकडे जमा करणार असल्याची घोषणा केली. मात्र यासंदर्भात कोणताही चेक जमा झाला नसल्याचं स्पष्टीकरण राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. आयटीआयमध्ये ही बाब उघड झाल्यानंतर आता सोमय्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.

६० कोटींचा लिलाव आणि संग्रहालय

  • भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला

  • ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती

  • १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या 'आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शवली होती

  • ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती

  • लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT