Kirit Somaiya on Pratap Sarnaik Kirit Somaiya
मुंबई

नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का? - सोमय्या

उद्धव ठाकरेंना या खंडणी प्रकरणाबद्दल सगळं काही माहित होतं, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

वैष्णवी कारंजकर

मंत्री नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत. मलिकांचे दाऊदशी थेट संबंध असल्याचं सकृतदर्शनी पुराव्यातून समोर आलं आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झालं, पण उद्धव ठाकरेंचेही त्याच्याशी संबंध आहेत का? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे. (Kirit Somaiya on Nawab malik and Dawood Connection)

नवाब मलिकांच्या विषयावर किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मलिक दाऊद गँगचे सदस्य हे सिद्ध झालं. पण आता चिंता महाराष्ट्राला ही आहे की जेलमध्ये गेल्यावर नवाब मलिकांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्माण झाले आहेत का? याबद्दल ठाकरेंनीच स्पष्टता करावी. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा म्हटलं की शरद पवारांचे दाऊदशी संबंध आहेत. पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी भागीदारी केली आणि आता शरद पवारांचे पार्टनर दाऊदशी पण भागीदारी केली. कोट्यवधींची मालमत्ता फक्त लाखांत कशी घेतली? आता न्यायालय सांगतंय की, नवाब मलिक म्हणजे दाऊद. असं असेल तर उद्धव ठाकरे, या शरद पवारांसोबत न्यायालयाविरोधात रस्त्यावर. असंही तुमचे प्रवक्ते न्यायालयाविरोधात बोलत असतात".

किरीट सोमय्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंवरही आरोप केले आहेत. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंना हा सगळा खंडणीचा प्रकार माहित होता.ठाकरे बिल्डर आहेत, त्यांचा मुलगा बिल्डर आहे. त्यांना या भागाचा दर माहित आहे. गोवावाला कम्पाऊंड तर मातोश्रीपासून जवळच आहे. काही लाखांत एवढी मोठी प्रॉपर्टी कशी घेता आली? उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधवांनी (Yashwant Jadhav) खूप जुन्या प्रॉपर्टी विकत घेतल्यात मग नवाब मलिकांनी लाखांत प्रॉपर्टी घेतली यात काय विशेष?"

बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार उद्धव ठाकरेंनी गहाण ठेवल्याचा आरोप करत सोमय्या म्हणाले, "मी स्टेजवर बसून बाळासाहेबांची भाषणं ऐकलीयेत. दाऊद शरद पवारांचा माणूस आहे, ते दोघे एकाच विमानातून गेले. पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या मुलाने वडिलांचे विचारच गहाण ठेवले, हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिक आणि ठाकरे सरकारला आता शिक्षा जनताच देणार".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT