Kirit Somaiya esakal
मुंबई

हल्ल्याच्या चौकशीसाठी सोमय्यांची हायकोर्टात धाव; केली 'ही' महत्वाची मागणी

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांविरोधातही केली तक्रार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावरील हल्ल्याच्या चौकशीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. (Kirit Somaiya rushes High Court to probe attack on him demanded CBI inquary)

सोमय्यांनी याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तक्रार केली आहे. तसेच आपल्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी माझ्यावर खोटी एफआयआ दाखल केली. याविरोधात आपण हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली असून याची तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती मी हायकोर्टात करणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या निघाले होते. यावेळी वाटेत शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. सोमय्यांच्या कारची काच फुटून त्यांच्या हनुवटीला जखम झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. पण सोमय्यांना झालेली जखम गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयानं मुंबई पोलिसांना दिलेल्या आपल्या वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT