kirit somaiya esakal
मुंबई

भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्यानं माझ्यावर गुन्हा; सोमय्यांचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.

मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटिस पाठवली आहे. याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. छगन भुजबळ यांच्या बेनामी प्रॉपर्टीची, ९ मजली बंगल्याची पाहणी केल्यानं आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ट्विट सोमय्यांनी केलं आहे.

सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ठाकरे सरकार/पोलीसची माझा विरुद्ध आणखी एक नोटीस. छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील 'बेनामी प्रॉपर्टी' ९ मजली बंगलोची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल.

भुजबळांची प्रॉपर्टी पाहणी केल्यानं आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसमध्ये कलम १८८ अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. तसंच याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पोलिसांनी सोमय्या यांना हजर राहण्यासही सांगण्यात आलं आहे. जर हजर न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT