मुंबई

'समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर...' नवाब मलिक यांना इशारा

'ठाकरे सरकारचे नेते ड्रग्ज माफीयांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत'

दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात एकाबाजूला NCB कडून धडाकेबाज कारवाई सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रवक्ते नवाब मलिक (Navab Malik) यांनी NCB आणि झोनल संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. सध्या नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदांचे सत्र सुरु आहे. रोज पत्रकार परिषदते ते नवनवीन गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

समीर वानखेडे यांच्याविरोधात जी मोहिम उघडली आहे, त्यावरुन आता माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक आणि ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. "ठाकरे सरकारचे नेते ड्रग्ज माफीयांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी आकसापोटी जी मोहिम उघडलीय, त्याचा मी निषेध करतो" असे किरीट सोमय्या यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

"मी ठाकरे सरकार आणि नवाब मलिक यांना इशारा देतो. समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्राची जनता त्या माफीयाला सोडणार नाही" असे किरीट सोमय्या यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. काल नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT