Ashish Shelar-Kishori Pednekar google
मुंबई

धमकीच्या पत्रानंतर पेडणेकरांना अश्रू अनावर, आशिष शेलारांना म्हणाल्या...

ओमकार वाबळे

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. तसेच संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौरांना(mumbai mayor) शिवीगाळही झाली आहे.

माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आलं आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकार परिषदेतच रडू कोसळलं.

पेडणेकर यांना शीवीगाळ करण्यात आली आहे. त्यांच्या चारित्र्यावर हीनपणे आरोप करण्यात आले आहे. यामुळे राजकारणाची पातळी खालावल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. अशा प्रकारांमुळे राज्यातील जनतेचा आणि शिवसेनेचा अपमान झाल्याचं पेडणेकरांनी म्हटलं.

मागील तीन दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांच्याभोवती काँट्रोव्हर्सी सुरू आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA ashish shelar) यांनी पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणात त्यांना अटक होणार असल्याची बातमी येत असतानाच ऑन टेबल जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर हे पत्र आल्याने राजकीय परिस्थिती ढवळून निघत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संबंधित प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी आवाहन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT