मुंबई

गलथान कारभार ! कुठे कोरोना रुग्ण गायब, कुठे कोरोना रुग्णाचा मृतदेह गहाळ, यावर महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबईत नक्की चाललंय काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलीये. याला कारण आहे ते म्हणजे कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयामधून गायब झालेला कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यानंतर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातून गायब झालेला कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह.

मुंबईतील कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयातून कोरोनाबाधित वृद्ध व्यक्ती हरवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह बोरिवली स्थानकात आढळून आलाय. संबंधित ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.  तर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेहच गायब झालाय. या दोन्ही घटनांनी रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.  

दरम्यान या घटनेची गंभीर दखल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतलीये. या प्रकरणी सखोल चौकशी करून ज्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय त्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. याचसोबत राजावाडी रुग्णालयातील प्रकारची चौकशी करणार असल्याचं आश्वासन किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. 

या सर्व दोन्ही घटनांची माहिती महापालिकेला आता मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणी BMC आता सखोल चौकशी करणार आहे. मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात असं काही घडलं असेल अशी मला खात्री वाटत नाही, मात्र जर घडलं आहे असं जर दिसत असेल तर त्यांच्यावर पोलिस केस होऊ शकते असं मुंबई महापौर किशोरी पेडणेकर म्हणालात. याबाबत संपूर्ण चौकडी केली जाईल आणि महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व कलमांतर्गत कारवाई केली जाईल, त्याचसोबत पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या कलमांतर्गत देखील कारवाई केली जाईल असं देखील किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.   

kishori pednekar on rajawadi hospital and shatabdi hospital read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT