मुंबई

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झालं. लॉकडाऊनच्या काळात सर्वंच गोष्टीवर निर्बंध आणण्यात आले. गेल्या दिड महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त असून मुंबईत त्याचा फैलाव जास्त झाला आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत. सध्या राज्यात तिसऱ्या लॉकडाऊनचा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात अनेक शिथिलता आली आहे. या काळात राज्यातल्या राज्यात अडकला असाल तर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याची तयारी सुरु केली. मात्र या प्रवासासाठी ई पास असणं आवश्यक आहे. मुंबईतून खासगी वाहनाने गावाकडे जायचं असेल तर खास ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. 

जर तुम्ही मुंबईत अडकला असाल तर तुमच्यासाठी खास ई- पासची सुविधा देण्यात आली आहे. सुरुवातीला अत्यावश्यक कामांसाठीच हा ई-पास मिळत होता. आता स्थलांतरित मजुरांनाही या पासचा लाभ घेता येणार असून त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करूनच हा पास मिळवता येईल. हा ई- पास तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळवू शकता. मुंबईत ऑनलाइन आणि ऑफलाइन पास मिळविण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून पोलिस उपायुक्तांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ऑनलाईन ई पास मिळवण्याची प्रक्रिया 

  • ई- पास मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय ठेवण्यात आलेत. 
  • जर तुम्ही ऑनलाईन पर्याय निवडलात तर महाराष्ट्र पोलिसांच्या या वेबसाईटवर https://covid19.mhpolice.in/ जाऊन माहिती भरावी लागणार आहे.  
  • वेबसाईटवर गेल्यावर नाव, सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार आणि त्या प्रत्येकाची नावं, मोबाईल नंबर, पत्ता, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रं, तुम्ही कोणत्या वाहनानं जाणार त्याची माहिती त्यात भरा.

ऑफलाईन ई पास मिळवण्याची प्रक्रिया

  • ऑफलाईन ई पास मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तु्म्हाला अर्ज करावा लागेल. 
  • सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार, त्या प्रत्येकाची नावं, मोबाईल नंबर, पत्ता, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रं, कोणत्या वाहनाने जाणार त्याची माहिती त्या अर्जात भरावी लागणार आहे.
  • यात बसची व्यवस्था स्वत:च करायची आहे. तसेच बसमधून केवळ 22 लोकांनाच जाता येणार आहे. बससाठी पैसे जमा करूनही बसची व्यवस्था झाली नाही तर पोलिसच स्वत: बसची व्यवस्था करून देताहेत. 

या संपूर्ण प्रक्रियेतून पार पडल्यानंतरच पोलिसांकडून ई-पास दिला जातो. त्याशिवाय ई-पास दिला जात नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील लोकांना ई-पास दिला जात नाही. तसंच कंटेन्मेंट झोनमधील नसलेल्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे, जर तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असेल तर पास मिळत नाही. शिवाय ज्या गावाला जाणार आहात, त्या गावच्या प्रमुखाची एनओसीही आवश्यक आहे. 

पास दिल्यानंतर गावाकडे गेल्यावर तिथल्या ग्रामस्थांनी प्रवेश नाकारल्यास राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी 

जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी करावी. हे पोर्टल सुरु झालं आहे. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

know complete procedure to get e pass to travel in maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT